@maharashtracity
धुळे: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील हाडाखेड परिसरातील आसरापाणी येथून पोलिसांनी छापा टाकत ७ किलो गांजा जप्त केला. ही कारवाई १४ रोजी दुपारी शिरपुर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
याप्रकरणी पो कॉ योगशे मोरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, दि. १४ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलिसांनी हाडाखेड परिसरातील आसरापाणी आदीवासी पाड्यावर राहणार्या सुभाष अमरसिंग पावरा (वय २७) याच्या घरावर छापा टाकला. तेथे पोलिसांना एका निळ्या रंगाच्या प्लास्टिक गोणीत भरुन लपवून ठेवलेला ७ किलो २०० ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळून आला. प्रति किलो १० हजार याप्रमाणे एकुण ७१ हजार रुपये किंमतीचा हा गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी सुभाष पावरा याला ताब्यात घेतले असून मानवी मेंदूवर परिणाम करणार्या अंमली पदार्थाची चोरटी विक्री करण्यासाठी साठवणुक केल्याप्रकरणी त्याच्या विरुध्द एन पी डी ए ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.