@maharashtracity
धुळे: धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील शेतकर्याचा चोरीस गेलेला कापूस खरेदी केल्याचा वाद पोलिसाने आपसात मिटविला होता. त्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडून चार हजारांची लाच घेतांना एका पोलिसाला अटक झाली. या प्रकरणी नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला.
शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील शेतकर्याचा कापूस शेतातून चोरी गेला होता. हा कापूस तक्रादार यांच्या भावाने खरेदी केल्याचा संशय होता. याबाबत शेतकर्याने नरडाणा पोलिस ठाण्यात अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी शशिकांत जगन्नाथ कोळी (वय 42) या पोलिसाकडे होता.
कोळीने हा वाद आपसात मिटविला. त्या मोबदल्यात कोळीने तक्रादाराकडे चार हजार रुपयांची लाच मागितली. या तक्रारीच्या आधारे धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (anti corruption bureau – ACB) उपअधीक्षक अनिल बडगुजर व त्यांच्या पथकाने बेटावद गावाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलीस कर्मचारी शशिकांत कोळी यास चार हजारांची लाच (bribe) घेतांना रंगेहाथ पकडले.