By विजय साखळकर

@maharashtracity

मस्तान दिवसभरात जितके पैसे मिळत राहायचे त्यातील दोन रूपये बाजूला काढून ठेवायचा. त्याला सिनेमाचं फार वेड होतं. रात्री शेवटचा शो पाहून तो त्याच्या राहत्या जागी परतायचा. रोज एक सिनेमा पाहणारच.

मस्तानला (Haji Mastan) हे वेड ज्यावेळी जडलं, त्यावेळी त्याला कल्पनाही नसेल मनाशी की पुढच्या जीवनात या क्षेत्रातील हस्ती आणि महान हस्ती आपल्या दाराशी रेंगाळत असतील. मस्तानकडून अनेक निर्मात्यांनी त्यांच्या त्यांच्या चित्रपटांसाठी फायनान्स (finance/ financer) घेतला होता.

मस्तान आणि त्याच्या अर्थपुरवठ्याखाली आलेला पहिला चित्रपट कोणता हे सांगता येणार नाही. कारण डोक्युमेंटेशन हा प्रकारच त्याच्याकडे नव्हता. तो पैसे देत असे. कुणाला किती दिले याचा हिशोब ठेवत नसे. पण नंतर त्याच्याकडे सिनेनिर्माते (film producer), दिग्दर्शक (film director), अभिनेते (actors), लेखक (scriptwriters) यांची वर्दळ सुरू झाली.

या बैठकीत मनसोक्त गप्पा व्हायच्या आणि त्यातून लेखक-दिग्दर्शकांना काही दृश्य मिळत असायची. असं म्हटलं जातं की या गप्पाटप्पातूंंनच हिंदी सिनेमाला ‘अँग्री यंग मॅंन’ (Angry Young Man) हे बिरूद चिकटलेला नायक मिळाला. पुढे यशस्वी कथानकांतून हाच हिरो हिंदी सिनेमातून डोकावू लागला.

पण अपरिहार्यपणे मस्तानच्या आयुष्यातील एक- दोन प्रसंगांना चांगली ‘सुहाना’ मसाल्याची फोडणी देऊन पूर्ण कथानक निर्माण केलं जात असे.

मात्र मस्तानचं प्रचंड वजन सिनेसृष्टीत असूनही त्यानं त्याचा गैरवापर केल्याचे किस्से नाहीत जे आजच्या काळात ऐकायला मिळतात. त्या काळात मस्तानचे सिनेमासृष्टीतील दोन किस्से फार कौतुकाने प्रसारित केले गेले होते…

Also Read: मस्तानची ‘कॅरियर’ कारकिर्द!

ते वृत्तपत्रातून किंवा आकाशवाणीवरून प्रसारित झाले नव्हते, तर फोटोग्राफर्सकडून सांगोवांगी जगभर झाले. त्यातला एक मात्र मी कुणाचेही नावे न घेता इथे देतो.

पत्रकारितेत फाटक्या तोंडाची म्हणून ओळखली जाणारी पण पत्रकारांना मात्र बड्या निर्मात्यांच्या पार्ट्यांमध्ये किंवा बड्या हिंदी चित्रपटांच्या सेटवर पत्रकारांना, विशेष करून मराठी पत्रकारांना अडवणा-या, त्यांना अपमानकारक पद्धतीने वागवणाऱ्या निर्मात्यांविरोधात कडक बिजलीचा अवतार घेणारी एक पत्रकार महिला मस्तानची मैत्रीण होती.

तिचा आब प्रचंड होता. ती लिहिताना शब्द असे काही वापरायची की तिच्याविरोवात केस टाकली तरी ती त्या संबधितावर बहिष्कार टाके. परिणामी हिंदी- इंग्रजी आणि अन्य कोणत्याच भाषेत संबंधिताच्या व्हेचरला (venture) जागा मिळत नसे. कारण ती एवढी एन्फ्लुएन्सिव्ह (influenced) होती की तिचा एक फोन… या सगळ्या बातम्या गोठवून टाकत असे. त्यामुळे तिच्या वाटेला सहसा भले भले जात नसत.

एका मजकुरात एका मातब्बर ‘ही मॅन’ बद्दल लिहिताना तिची लेखणी घसरली आणि नकळत तिनं त्याचा ‘जाट’ (Jaat community) असा उल्लेख केला. त्या उल्लेखाने तो भडकला आणि एका पार्टीत गाठ पडल्यावर त्यानं नाना नाटके केली आणि इतर लोक त्याला आवरण्यासाठी प्रयत्न करू लागली. पण त्याच्या बेफामपणानं तो आवरला जात नव्हता आणि् तिला पार्टीमधून पळ काढावा लागला. मागोमाग हा हिरोही धावला…

बचावासाठी तिला अखेर रेसमध्ये धावणाऱ्या घोड्यांच्या तबेल्यात घुसावं लागलं. फुल्ल ‘ठा’ झालेला हा नट वीस मिनिटं बाहेर आपलं शौर्य दाखवत राहिला…..’आओ……घोडा लगाता हूं..’ असा दम देत राहिला.

तो निघून गेल्याची खात्री करून ती बाहेर आली आणि थेट मस्तानकडे गेली. रातोरात मस्तानच्या खनपटीला बसून तिनं त्या नटाचं शूटिंग कुठे आहे ते शोधून काढलं आणि सेटवर ती आली सोबत घोडा आणि मस्तानची माणसं….

सेटवर आल्यावर तिनं प्रोड्युसरला (film producer) पकडला आणि त्यालाच हाग्या दम दिला…. ‘कहा है तुम्हारा हीरो…… मुझे घोडा लगानैवाला था…. लाया हूं… आओ बाहर…. वरना मै अंदर आकर घोडा……‌’

शूटिंग थांबलं होतं. हिरो (Hero/ actor) आत कुठेतरी लपून बसला होता. निर्माता त्या पत्रकारबाईची समजूत घालताना जेरीस आला होता. हिरो तर टरकलाच होता. शुटिंग (film shooting) रखडल्यानं दर मिनिटाला त्याचा खर्च वाढत चालला होता. करायचे काय…?

अखेर निर्मात्यानं लपून बसलेल्या नटाला. सांगितले, कोणताही प्रकार घडू शकतो. तू माफी माग नाहीतर मला सिनेमा तर गुंडाळावा लागेलच पण आयुष्यातत पुन्हा कधी निर्मितीत येता येणार नाही. तू तर थेट ‘गाववाला’ होशील… बघ…..”

ही मात्रा मात्र चालली. त्यानं त्या पत्रकारबाईची माफी मागितली. प्रकरण तिथंच मिटलं. पण नाचक्की त्या हिरोची झाली……

दुसरा किस्सा आहे तो सोना या अभिनेत्रीचा. तो किस्सा नाही तर इतिहास आहे…. (पुढील लेखात वाचा)

(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here