@maharashtracity

महाड: महाडमधील जनकल्याण सहकारी पतपेढीच्या शाखाधिकारी याने एका महिलेला सातत्याने कॉल करून लज्जा उत्पन्न होईल, अशा प्रकारचे कृत्य केल्याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पतपेढीच्या शाखाधिकारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड शहर पोलिसांनी (Mahad Police) दिलेल्या माहितीनुसार जनकल्याण पतपेढीचे शाखाधिकारी सुधीर महाडिक यांनी शहरातील एका महिलेला कर्ज मंजुर करून देतो, कर्ज मंजुर करून देणे माझ्या हातात आहे असे सांगून पिडीत महिलेच्या मोबाईलवर सातत्याने कॉल करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

या प्रकरणी या महिलेने महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या तक्रारीनुसार सुधीर महाडिक रा. रोहिदास नगर यांच्या विरोधात १/०४/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यानुसार भादवि कलम ३५४, ३५४ अ, ३५४ अ (१) (२), ३५४ ड, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार एच.एच. डवले या करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here