@maharashtracity

32 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त, सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

धुळे: मध्य प्रदेशातून धुळेमार्गे नंदुरबार येथे विक्रीसाठी जाणारा 32 लाख रुपयांचा मद्यसाठा व दोन मोटारी, असा 50 लाख 44 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुष्पा चित्रपटाप्रमाणेच मालमोटारीत एक मोठे प्लायवुड उभे करुन एक स्वतंत्र कप्पा निर्माण करुन त्या खात्यात 32 लाखांचा मद्यसाठा लपविला होता. तरीही तालुका पोलिसांनी तो मद्यसाठा पकडला.

मध्यप्रदेशातील खलघाट येथून मालमोटार क्र.एमपी 09-एच.एफ. ही नवापुर जि.नंदूरबार येथे मद्यसाठा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहीती धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार शुक्रवारी पहाटे पाच वाजता नागपूर सुरत महामार्गावरील मुकटी शिवारातील सापळा लावून निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पथकाने सापळा लावून हॉटेल करणीजवळ ती मालमोटार पकडली.

त्या मालमोटारीची झडती घेतली असता आतून ती पुर्णपणे रिकामी होती. पण, पुष्पा चित्रपटात दाखविल्याप्रमाणे वरुन दुधाची टँकर आणि आतून रक्तचंदनाची तस्करी होते. त्याप्रमाणे मालमोटारीत एका प्लायवूडच्या सहाय्याने एक मोठा कप्पा केलेला होता. त्या खात्यात विदेशी मद्याचे 255 खोके आढळून आलेत. या मालमोटारीचा चालक पप्पूसिंग रघुनाथसिंग दोडिया (वय 35, रा.उनी ता.जावरा जि.रतलाम) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तसेच या दारुच्या मालमोटारीला वाहतूकीसाठी सहाय्य करणारी स्कार्पिओ मोटार क्र.जी.जे.06-सी.एफ.2133 हे व त्यावरील तौसिमोद्दीन रशीदरभाई शेख, उमेश दुर्गादास वसावा दोघे रा.नवापुर यांना सुध्दा पकडण्यात आले. या कारवाईत 32 लाख 74 हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा, 10 लाख रुपयांची मालमोटार, आठ लाख रुपयांची स्कार्पिओ, असा एकुण 50 लाख 74 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणही तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक प्रविण पाटील, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी साक्री प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक निरीक्षक भुषण कोते, उपनिरीक्षक सागर काळे, हे कॉ प्रविण पाटील, सोमनाथ कांबळे, पोना योगेश पाटील, पो कॉ कुणाल शिंगाणे, पो कॉ धिरज सांगळे, पो कॉ भुषण पाटील, प्रमोद पाटील, योगेश पाटील, चालक पोना प्रकाश भावसार यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here