मध्य प्रदेशातील व्यापार्‍यासह दोघांना अटक

धुळे: मुंबई – आग्रा महामार्गावरील मोटारींची तपासणी करताना मोहाडी पोलिसांना मध्यप्रदेशच्या व्यापार्‍याकडे अडीच किलो गांजा, गावठी बंदूक, काडतूस आणि रामपूरी चाकू, असा मुद्देमाल मिळून आला. या कारवाईत पोलिसांनी मध्यप्रदेशातील व्यापार्‍यासह दोघांना ताब्यात घेतले.

मोहाडी पोलिसांचे पथक रात्री गस्तीवर असताना मुंबई- आग्रा महामार्गावर लळींग टोलनाक्याजवळ एम.एच.16/7151 क्रमांकाच्या उघड्या मोटारीबाबत त्यांना संशय आला. मोहाडी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, हवालदार अशोक पायमोडे, हवालदार शाम निकम, शाम काळे यांच्या पथकाने चालक-मालक नदीम मोहम्मद शमीन सिद्दीकि (वय 32, रा.नवी मुंबई) आणि असलमखान अलीयारखान पठाण (वय 40, रा.प्रितमपुर चौपाटी हॅण्डपंपाजवळ, महु जि. धार, मध्यप्रदेश) या व्यापाऱ्याची चौकशी केली.

दोघांकडे असलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यात दोन किलो 500 ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच दुसऱ्या पिशवीत पंधरा हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीची बंदूक, जीवंत काडतुसे, रामपुरी चाकू मिळून आला. पोलिसांनी मोटारीसह तीन लाख 82 हजार 900 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here