@maharashtracity
धुळे: गुजरातमधील (Gujarat) वापी (Vapi) येथुन धुळ्याच्या एमआयडीसीत (MIDC) रंगाचे ड्रम घेवून जाणार्या मालमोटारीमधून सोनगीर पोलिसांनी लाखोंचा २८ लाखांचा गुटखा (Gurkha) पकडला.
या प्रकरणी मालमोटारीसह ३८ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
दोंडाईचाहून धुळ्याकडे (Dhule) जाणार्या एम.एच.१५/एफ.यू. ८८५५ या मालमोटारीमधून गुटखा तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्याने सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, हेकॉ.भदाणे यांच्यासह पथकाने फाट्यावर सापळा रचून कारवाई केली.
या कारवाईत मालमोटारीत सुमारे २८ लाखाचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी वाहनासह ३८ लाखांचा गुटखा जप्त केला. वापीहून रंगाचे ड्रम घेवून ही मालमोटार धुळे एमआयडीसीत जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी चालक मुश्तकीम शेख राजू रा.धुळे, जुल्फेकार शेख नुरमोहम्मद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.