@maharashtracity
धुळे: खोपोली (मुंबई) (Khopoli) येथून जिवंतमासे घेऊन इंदूरकडे (Indore) जाणारी मालमोटार शिरपूर- चोपडा फाट्यावरील उड्डाणपुलाजवळ शनिवारी उलटला. अपघातानंतर वाहनातील जिवंत मासे रस्त्यावर आणि बाजूच्या शेतात विखूरले. यामुळे सर्वत्र माशांचा खच पडलेला दिसत होता. हीच संधी साधून रस्त्यावरील लोकांनी अक्षरशः मासे लूट केली.
रायगड (Raigad) जिल्ह्यातील खोपोली येथून जिवंत मासे घेऊन मालमोटार क्र.एमएच ४३/बीजी ६३९९ इंदूरकडे जात होता. ती मालमोटार शनिवारी पहाटे मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai – Agra Highway) दहिवद गावाजवळील चोपडा फाट्याजवळ पलटी झाली.
जिवंत मासे रस्त्यावर व शेतात पडलेले पाहून नागरिकांनी माशांची लूट केली. अनेकांनी वाहने थांबवून मासे घेत तेथून पोबारा केला. उर्वरीत मासे दुसर्या मालमोटारीत भरुन नियोजीत स्थळी पाठविण्यात आले. याबाबत अल्लाउद्दीन रफतान याने दिलेल्या माहितीनुसार अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.