X : @milindmane70

महाड – कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात शनिवारपासूनच पावसाने रौद्र रूप धारण केल आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत, तर सकाळपासून जगबुडी नदीचे पाणी खेड शहरात (water of Jagbudi river enters into Khed city) शिरण्यास सुरुवात झाल्याने खेड मधील व्यापारी भीतीच्या सावटाखाली आहेत.

रायगड (Raigad) जिल्ह्यातील नागोठणे (Nagothane) शहरात पुराचे पाणी शिरल्याने बाजारपेठेमध्ये आपले सामान वाचवण्यासाठी नागरिकांची व व्यापाऱ्यांची धावपळ सुरू आहे, तशीच परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड (Khed) तालुक्यात झाली असून खेड शहरातील जगबुडी नदीने शहरातील बाजारपेठेत प्रवेश केला आहे. पाणी शिरल्याने नागरिक आपापले सामान वाचवण्यासाठी जीवाची परकाष्टा करीत आहेत. शहरातील मच्छी, मटन मार्केटपासून जगबुडी नदीच्या पाण्याचा प्रवाह शहरातील मुख्य बाजारपेठेत शिरल्याने व्यापाऱ्यांची देखील आपले सामान हलवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरू आहे. पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन खेडचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) माजी नगराध्यक्ष व कोकणचे मनसे नेते वैभव खेडेकर (Vaibha Khedekar) हे संभाव्य पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असून पुराचे पाणी शहरात घुसून हाहाकार होऊ नये, यासाठी त्यांनी प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here