भाजप महिला मोर्चाचे आंदोलन
@maharashtracity
धुळे
किराणा दुकांनामधून वाईन विक्रीचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चातर्फे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र पाठविण्यात आले. तसेच या निर्णयाविरुध्द मुख्य टपाल कार्यालयाबाहेरआंदोलनही करण्यात आले.
या आंदोलनात भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष मायादेवी परदेशी, अल्पा अनुप अग्रवाल, वंदना थोरात, वैशाली शिरसाठ, मनिषा ठाकूर, रत्ना बडगुजर, प्रिया कपोले, उमा कोळवले, अनुभा देशपांडे, ललीता थोरात, संगिता राजपूत, संध्या चौधरी, प्रियंता सोनार, आशा चौधरी, अंजना साळुंके, शिला राणा, ज्योती राणा, रेखा बुचकुले आदी कार्यकर्त्यां सहभागी झाल्या होत्या.
भाजप महिला मोर्चाने लिहीलेली पत्र शहरातील मुख्य टपाल कार्यालयातून मुख्यमंत्र्यांना पाठविली. पत्रानुसार, केवळ महसूल मिळावा याकरिता महाराष्ट्रातील राज्य सरकारने इतर राज्याप्रमाणे किराणा दुकानात वाईन विक्री करण्याची मुभा दिली. ही बाब निषेधार्य असून या निर्णयाने भावी पिढी बर्बाद होईल. युवकांना दारूचे व्यसन लागेल. महिला-भगिनींचा संसार उध्वस्त होईल. परिणामी हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी करीत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने पत्राद्वारे केली आहे.