@maharashtracity

मुंबई: वरळी बीडीडी चाळ येथील गॅस सिलेंडर दुर्घटनेत 4 महिन्याचा बालक उमेश याच्या पाठोपाठ त्याचे वडील आनंद पुरी यांचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोनवर गेली आहे.

सध्या, या दुर्घटनेतील जखमी विद्या पुरी (२५) आणि विष्णू पुरी (५) यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नायर रुग्णालयात चारही जण जखमी असताना त्यांच्यावर उपचार करण्यात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप होऊन त्याबाबतचा एक व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून नायर रूग्णालयातील दोन डॉक्टर व एका नर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून सखोल चौकशीनंतर दोषींवर आणखीन गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे.

तसेच, या घटनाप्रकारचे तीव्र पडसाद स्थायी समिती व पालिका सभेतही उमटले होते. शुक्रवारी तर शिवसेना व भाजप नगरसेवकांत राडाही झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here