मतदानाचा अधिकार राहिला दूर; दिवसभर फरफटीने तणाव

मुंबई

त्या दोघांनी आज दिवसभरात मतदार यादीतील (voters list) नावासाठी तीन मतदान केंद्र तपासली… त्यांना आपला मतदानाचा अधिकार (right of voting) बजवायचा होता. दर निवडणूकीला आपले नाव बिनदिक्कत मतदार यादीत येते यावर असलेल्या त्यांच्या विश्वासाला आज तडा गेल्याने ते विन्मुख होऊन घरी परतले. त्यांना मतदार यादीतील त्यांची नाव काढली गेली म्हणजे संविधानातील मतदाराचा अधिकार काढून घेण्यासारखेच आहे. लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी मोठ्या उत्साहाने गेलेले ते दोघे लोकशाहीवरील विश्वास दृढ करण्याऱ्यांच्या प्रतिक्षेत आहेत.

लोकसभा निवडणूकीत मतदान प्रक्रियेला विलंब, यासह मतदार यादीतील नावे गायब असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळल्या. मतदार यादीतील (voters list) कुटुंबातील एकाचे नाव आहे तर इतर चार जणांचे नावे नाहीत अशा घटना घडल्या आहेत. मतदार यादीत आपले नाव आहे, या भरवशावर मतदान केंद्रावरुन मतदान केल्याशिवाय घरी परतावे लागले असल्याच्या घटना आज दिवसभरात घडल्या. तुमचे नावच यादीत नाही असे सांगत त्यांना परत घरी पाठवण्यात आले. मात्र यातील काहींनी मतदान केंद्र, मतदार यादीवर काम करत असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना भेटी दिल्या. त्यातूनही त्यांच्या हाती काहीच लागले नसल्याने विन्मुख होऊन घरी परतावे लागले.

पवईतील (Powai) आनंद काकडे आणि त्यांची पत्नी वनिता काकडे हे दांपत्य मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले. मात्र त्यांना त्यांची नावे मतदार यादीत आढळली नाहीत. आयआयटी मतदान केंद्रावर नावाची यादी केंद्रावरील सहाय्यकांकडून तपासून घेतली. मात्र त्यांची नावे मतदार यादीत नव्हती. आनंद यांना लाल बहादूर शास्त्री रोड, कांजूरमार्ग येथील मुख्य मतदान केंद्रांवर जाण्याची सुचना केली. मात्र त्या केंद्रावर देखील त्यांची नावे यादीत नव्हती. त्यांना १७ नंबर फॉर्म भरण्याचे सुचविण्यात आले, मात्र यंदाच्या निवडणूकीतील मतदानाचा अधिकार प्रश्नांकितच राहणार होता. पुढे त्यांना विक्रोळी येथील निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुचविण्यात आले. येथे मात्र आनंद यांची मतदान करण्याची इच्छा संपल्याने ते घरी परतले.

दुसऱ्या प्रकरणात आयआयटी केंद्रीय विद्यालयात मतदान केंद्र असलेल्या फ्रिलान्स फोटो जर्नालिस्ट प्रशांत वायदंडे यांचे यादीत नाव नसल्याचे आढळून आले. प्रशांत यांच्या कुटुंबातील चौघांची नावे मतदार यादीत नव्हते. यातील प्रशांत यांचा भाऊ हेमंत वायदंडे हे सकाळी आठ वाजता केंद्रीय विद्यालय मतदान केंद्रावर गेला. त्याला नाव न आढळल्याने त्यांना फॉर्म १७ भरण्याचे सुचविण्यात आले. मात्र निवडणूक अधिकारी आल्यावरच ही प्रक्रिया होऊ शकते. निवडणूक अधिकारी ११ वाजता मतदान केंद्रावर येणार होते. हेमंत यांनी ११ वाजेपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांची वाट पाहिली. मात्र ते न आल्याने काही काळ अधिक वाट बघून तसेच पुण्याला काम असल्याने हेमंत पुण्याला रवाना झाला.

प्रशांत मतदान केंद्रावर सकाळी ११ वाजता आला. प्रशांत यांनाही फॉर्म १७ भरण्याबाबत सुचवि़्ाण्यात आले. यावेळी त्यांना निवडणूक अधिकारी दुपारी ३ वाजता येणार असल्याचे सांगण्यात आले. कंटाळलेल्या प्रशांत यांनी फोनाफोनी करून संबंधित चौकशीच्या ठिकाणाची माहिती घेत तो देखील सेंट झेव्हियर्स येथील मतदान केंद्रावर जाऊन त्याच्या नावाची तपासणी केली. मात्र त्या ठिकाणी त्यांना नाव आढळले नाही. हे का घडले यांचा विचार घरी रिकाम्या हाताने परतलेले मतदार करत आहेत. दरम्यान, यंदा लोकसभेच्या निवडणूक मतदार यादीतून बहुतांश मुंबईकरांची नावे गायब आहेत. या घटनेची कारणे नक्की शोधावीत अशी मागणी या मतदारांकडून होत आहे

माझ्या बुथमधील मतदाराचे नाव गहाळ झाले असे कोणते प्रकरण नाही. मात्र मतदाराने स्थलांतर केले असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी नाव एनरॅाल केले असेल. अशा प्रकरणात मतदाराचे नाव गहाळ होण्याची शक्यता असते.
नंदकिशोर भगत, झोनल अधिकारी, झोन २९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here