By Sadanand Khopkar
Twitter : @maharashtracity
नागूपर: राज्य मराठी भाषा विभागाच्या मुंबईमध्ये ४ ते ६ जानेवारी २०२३ या कालावधीत वरळी येथील नॅशनल स्पोर्ट स्टेडिअम येथे मराठी विश्व परिषद आयोजन होत आहे. या परिषदेत २० देशांतील प्रतिनिधी सहभागी होतील, अशी माहिती राज्याचे मराठी भाषा विकासमंत्री दिपक केसरकर यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
दीपक केसरकर म्हणाले, ‘‘४ जानेवारी या दिवशी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन होईल. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणारे जगभरातील ४५६ मराठी भाषाप्रेमी या परिषदेत, तसेच भारतातील विविध शहरांतील ४९८ प्रतिनिधी आणि देशातील ज्या शहरात मराठी भाषा जेथे बोलली जाते तेथील एक हजार मराठी भाषाप्रेमीची उपस्थिती लाभेल. जगभरात मराठी भाषा आणि संस्कृती यांचा प्रसार व्हावा, यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक आणि उद्योग विभाग यांचेही साहाय्य या परिषदेला लाभणार आहे. या परिषदेत मराठी संस्कृती आणि भाषा याविषयीचे कार्यक्रम, तसेच चर्चासत्रे होणार आहेत,’’ अशीही माहिती त्यांनी दिली.