@maharashtracity

मुंबई: दादर (प.), रानडे रोड येथे सोमवारी सकाळी भेंडीचे झाड कोसळले. या घटनेत एक चार चाकी गाडी व बाईकचे नुकसान झाले. तर रस्ते वाहतुकीला काही वेळ अडथळा निर्माण झाला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

प्राप्त माहितीनुसार, दादर (प.), रानडे रोड येथील शुश्रूषा रूग्णालयानजीक असलेले भेंडीचे झाड सोमवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास तेथे पार्क केलेल्या एका चार चाकी व दुचाकी वाहनांवर कोसळल्याने या वाहनांचे मोठे नुकसान झाले. ही दुर्घटना सकाळी लवकर घडल्याने रस्त्यावर जास्त रहदारी नव्हती.

घटना घडल्यावर पालिकेच्या जी/ उत्तर प्रभाग कार्यलयातील उद्यान खात्याच्या अधिकारी व कर्मचारी यांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू केले. त्यामुळे अवघ्या अर्धा ते पाऊण तासात रस्त्यावर पडलेले झाड व त्याच्या मोठया फांद्या कापून रस्ता रहदारीसाठी तात्काळ मोकळा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here