@maharashtracity

फक्त खासगी केंद्रांवर लस मिळणार

११ सप्टेंबरला लसीकरण पूर्ववत होणार

मुंबई: कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण (Covid-19 vaccination) मोहिमेतंर्गत नागरिकांना दोन्ही डोस देवून अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी व पुढील नियोजन करुन प्रशासकीय व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. या कारणाने मुंबईतील शासकीय आणि महापालिका केंद्रांवर १० सप्टेंबर रोजी कोविड लसीकरण बंद राहणार आहे. मात्र खासगी लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध असणाऱ आहे.

यासंदर्भातील माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. महापालिकेकडे (BMC) कोविड लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असून शनिवार ११ सप्टेंबर रोजी लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार आहे.

कोरोनावर अद्यापही औषध उपलब्ध झालेले नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अधिकाधिक नागरिकांना कोविड लसीच्या दोन्ही मात्रा देवून लसीकरण पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे.

ज्ये‍ष्ठ नागरिकांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण (Drive in vaccination for senior citizen) अंथरुणास खिळलेल्या व्यक्तिंचे त्यांच्या घरी जावून लसीकरण, एलजीबीटी (LGBT) समुदायातील नागरिकांसाठी विशेष लसीकरण केंद्र, दुसरी मात्रा देय असलेल्या‍ नागरिकांसाठी एक संपूर्ण दिवस विशेष सत्र असे विविध उपक्रम राबवताना सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचून कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविली जात आहे.

फक्‍त महिलांसाठी विशेष कोविड लसीकरण

लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत फक्‍त महिलांसाठी विशेष कोविड लसीकरण सत्र आयोजित करण्याचा पालिकेचा विचार आहे. येत्या काळातील अशा विशेष लसीकरण मोहिमांचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक बाबींची पूर्तता करणे आणि सर्व संबंधित लसीकरण केंद्रांना आवश्यक सूचना देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे, असे पालिकेने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here