राजाची उंची फक्त ४ फुटाची ठेवणार!

@maharashtracity

मुंबई: गत वर्षी कोरोनामुळे मुंबईतील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध आले होते. सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी मर्यादित स्वरूपात गणेशोत्सव साजरा केला. त्याप्रमाणे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने देखील मर्यादित उत्सव साजरा करून आरोग्य उत्सव साजरा केला. यंदा मात्र लालबागचा राजा (Lalbag cha Raja) मंडपात विराजमान होणार असून राजाचे दर्शन ऑनलाईन ठेवणार आहेत.

दरम्यान यंदा लालबागचा राजा विराजमान होणार असल्याचा अंतिम निर्णय मंडळाकडून घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर लालबागचा राजा विराजमान झाला नव्हता. मात्र, गणेश भक्तांच्या विनंतीला मान देऊन यावर्षी मंडळाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा गणेशोत्सव राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच साजरा केला जाईल असेही मंडळाने जाहीर केले आहे. तसेच सरकारने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे यावर्षी लालबागच्या राजाची मूर्ती केवळ चार फुटांचीच असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९३४ साली झाली असून गेल्यावर्षी कोरोनाच्या उद्रेकामुळे ८६ वर्षांनंतर पहिल्यांदाच मंडळाने गणेशोत्सव साजरा केला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here