@maharashtracity
पालिका सेंटरमध्ये होणार रवानगी
सध्या ६ लाख ६३ हजार लोक होम क्वारेंटाईनमध्ये
मुंबई: मुंबईत कोविड रुग्ण (covid patients) संख्येला आळा घालण्यासाठी व गृह विलगीकरणाचे (Home quarantine) नियम मोडणाऱ्यांच्या हातावर पालिकेकडून ‘स्टॅम्प’ (stamp) मारण्यात येणार आहे.
मुंबईत सद्यस्थितीत ६ लाख ६३ हजार रुग्ण गृह
विलगीकरणात आहेत. मात्र अशा व्यक्तिने नियम मोडल्याबाबत कोणाची तक्रार पालिकेकडे आल्यास त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याची रवानगी पालिकेच्या विलगीकरण कक्षात करण्यात येणार आहे. पालिकेने कोविडच्या यापूर्वीच्या दोन लाटांप्रसंगी अशी कारवाई केली होती.
गृह विलगीकरणचे नियम मोडत असल्याने रुग्ण संख्येचा वाढता धोका पाहता पालिकेने नाईलाजाने हा निर्णय घेतला असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी सांगितले.
मुंबईत सद्यस्थितीत तब्बल ६ लाख ६३ हजार जण गृह विलगीकरणात आहेत. मुंबईत कोविड (covid) व ओमायक्रॉनच्या रुग्ण (Omicron patient) संख्येत गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढ झाली होती.
चार दिवसांपूर्वी कोविड रुग्णांची संख्या तब्बल २० हजारांवर पोहोचली होती. त्यामुळे राज्य सरकार व पालिका प्रशासनाने मुंबईत काही निर्बंध लागू केले. परिणामी गेल्या २४ तासात रुग्ण संख्या २० हजारावरून आता ११ हजारांवर घसरली आहे.
विलगीकरणाचे नियम मोडणार्यांवर कारवाई करण्याचे अधिकार प्रत्येक वार्डातील ‘फिल्ड ऑफसर’ला (Field Officer) देण्यात आले आहेत. तसेच, विलगीकरण नियमांचे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोसायट्यांच्या पदाधिकार्यांना देण्यात आली आहे.