आगीत कोणीही जखमी नाही -: अग्निशमन दल

मुंबई: मानखुर्द येथे आज मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागून त्यामध्ये भंगार सामानांची ८ – ९ गोदामे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

प्राप्त माहितीनुसार, मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर परिसरातील झोपडपट्टीत, भंगार सामानाच्या गोदामांच्या ठिकाणी अधूनमधून लहान मोठ्या आगी लागण्याच्या घटना घडत असतात. जवळच डंपिंग ग्राउंड ( Dumping ground) असून त्यावरील कचऱ्याला तर नेहमीच आग लागत असते.

घाटकोपर – मानखुर्द लिंक रोड ( Ghatkopar- Mankhurd link road) , मानखुर्द येथील कुर्ला स्क्रॅप मानखुर्द मंडाला भागातील एका भंगार सामानाच्या गोदमाला आज मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास आग लागली. भंगार सामानाच्या गोदामाला आग लागल्याने ती आग हळूहळू भडकली व स्तर -३ ची आग झाली.

त्यामुळे या आगीची झळ आजूबाजूच्या रबर, प्लास्टिक, लोखंडी सामानाच्या ७ – ८ भंगार गोदामांना बसली. त्यामुळेच आगीने भीषण रूप धारण केले होते.

आगीच्या वृत्ताने येथील परिसरात खळबळ उडाली. स्थानिकांनी जळत्या गोदामांपासून काही अंतरावर गर्दी केली होती.

या आगीची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी ( Fire brigade) तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सदर भीषण आगीवर ५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नियंत्रण मिळवले. मात्र आग विझविल्यानंतरही कुलिंग ऑपरेशन ( Cooling operation) काही काळ सुरू होते.

आगीत कोणीही जखमी नाही -: अग्निशमन दल

मानखुर्द येथील प्लास्टिक, लोखंड, रबर आदी विविध प्रकारच्या भंगार सामानांच्या गोदामांना स्तर -३ ची भीषण आग लागली होती. मात्र अग्निशमन दलाने १२ फायर इंजिन व १० वॉटर टँकर यांच्या साहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळवून आग विझविली.

मात्र या आगीत कोणीही जखमी झाल्याचे सध्या तरी वृत्त नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे उप प्रमुख अधिकारी राजेंद्र चौधरी (Rajendra Chaudhary, Deputy Chief of Fire Brigade) यांनी आमच्या प्रतिनिधिंशी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here