@maharashtracity

नायर रुग्णालयाला शतकपूर्तीच्या निमित्ताने १०० कोटींचा निधी

वैद्यकीय कौशल्य, संगणक प्रशिक्षण प्रयोगशाळा, रोगप्रतिकारशक्तीशास्त्र संशोधन केंद्राचे लोकार्पण

भारतीय टपाल खात्याकडून नायर रुग्णालयावर विशेष टपाल आवरण प्रकाशित

मुंबई: मुंबई शहर व उपनगरे येथील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणणे आणि मृत्यू दर करण्यात पालिका, सरकारी, खासगी रुग्णालयातील डॉक्टर व त्यांची टीम कारणीभूत आहे. त्यामुळे कोरोनाबाबत यशस्वी ठरलेल्या मुंबई मॉडेलचे (Mumbai Model to control corona) खरे मानकरी डॉक्टर व त्यांची टीम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले आहे.

तसेच, मुंबईतील पालिका मालकीच्या तीन प्रमुख रुग्णालयांपैकी एक नायर रुग्णालयाला (Nair Hospital) शतकपूर्तीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, १०० कोटी रुपयांचा निधी राज्य शासन व मुंबई महापालिका यांच्या संयुक्त माध्यमातून देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेच्‍या (BMC) नायर रुग्‍णालयाचा शतकपूर्ती सोहळा शनिवारी मुंबई सेंट्रल, नायर रुग्‍णालयाच्या सभागृहात पार पडला. या सोहळ्याला पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्‍हा पालकमंत्री आदित्‍य ठाकरे (Guardian Minister Aaditya Thackeray), वस्‍त्रोद्योग मंत्री अस्‍लम शेख (Aslam Shaikh), महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar), आ.यामिनी जाधव, आ.रईस शेख, उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, महाराष्ट्र व गोवा मंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल हरिशचंद्र अग्रवाल, आदी उपस्थित होते.

नायर रुग्णालयाचा शंभर वर्षांचा प्रवास थक्क करणारा आहे. या रुग्णालयात स्वतः जीव ओतून रुग्णांना जीवनदान देण्याचे काम येथील डॉक्टर व त्यांच्या टीमने केले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी नायर रुग्णालय प्रशासनाचे तोंडभरून कौतुक केले.

मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख यांनी ‘ग्लिम्प्सेस ऑफ नायर पब्लिकेशन’ या वैद्यकीय शोधनिबंधांच्या संग्रहाचे प्रकाशन केले. तसेच, कोविडच्या कालावधीमध्येही नायर रुग्णालयाने मोलाची कामगिरी बजावली असल्याचे मंत्री शेख यांनी नमूद केले.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, नायर रुग्णालयाची शंभर वर्षांत चांगली कामगिरी झाली असल्याचे सांगत प्रशंसा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here