@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाने कोरोनामुळे आर्थिक फटका बसल्याने त्याची कसर भरून काढण्यासाठी व पालिकेच्या महसुलात भर टाकण्यासाठी विविध आकार – शुल्कात दरवर्षी ५% दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी आणला आहे. मात्र मागील दरवाढी संदर्भातील प्रस्तावांचे उदाहरण पाहता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावालाही विरोधी पक्ष, भाजप (BJP) व सत्ताधारी यांच्याकडून विरोध केला होऊन प्रसंगी प्रस्ताव फेटाळून लावला जाण्याची दाट शक्यता आहे.

तसेच, सत्ताधारी शिवसेनेचे (Shiv Sena) उपनेते व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी, मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ अथवा दरवाढ लादण्यात येणार नाही, अशी ग्वाही मुंबईकरांना (Mumbaikar) दिली आहे.

महापालिका कीटकनाशक विभागाच्या खात्यामार्फत, पाण्याची कारंजी, सुशोभित हौद, दगडांच्या / खडकांच्या कलाकृती, कृत्रिम धबधबे इत्यादींच्या उभारणीसाठी आवश्यक अर्ज पुस्तिकेसाठी १०० रुपये ऐवजी यापुढे १०५ रुपये शुल्क वसुली करणे. तसेच, पडताळणी फी ४०० रुपयांवरून ४२० रुपये, परवानगी व नूतनीकरण फी ६ हजार रुपयांवरून ६ हजार ३०० रुपये, सुरक्षा अनामत रक्कम २० हजार रुपयांवरून २१ हजार रुपये अशी शुल्कवाढ करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

या प्रस्तावाला सर्वपक्षीयांकडून होणारा विरोध लक्षात घेता हा प्रस्ताव फेटाळला जाऊन प्रशासन तोंडघशी पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here