@maharashtracity

परिणामांचा अभ्यास करून होणार पुढील निर्णय

मुंबई: पवई तलावात (Powai lake) उगवलेल्या वनस्पती नष्ट करण्यासाठी ग्लायफोसेट तणनाशकासारख्या विषारी रसायनांची फवारणी सुरू होती. मात्र तलावात मगरी आणि अन्य प्राणी असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) ही फवारणी बंद करण्याच्या सूचना केल्या असून फवारणीचा जलचरांच्या आरोग्यावर संभाव्य दुष्परिणामाचा अभ्यास केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, सध्या तलावामध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाच्या तयारीचा भाग म्हणून तलावाच्या सीमांवरील जागा स्वच्छ केल्या जात आहेत. या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात असून दरवर्षी तलाव स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र तलाव स्वच्छ करताना केवळ त्यावर उगवलेल्या वनस्पती काढल्या जातात. गाळ उपसला जात नाही, असे वनशक्ती या पर्यावरण संस्थेचे संचालक डी. स्टॅलिन सांगतात.

यंदा ही झाडे हाताने काढण्याऐवजी पालिकेकडून तलावातील वनस्पतींवर तणनाशक फवारणी केली जात होती. मात्र, त्यामुळे तलावातील मगरी तसेच अन्य प्राण्यांवर होणारा दुष्परिणाम लक्षात घेतला गेला नाही. त्यामुळे स्टालिन यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने तक्रारीची दखल घेत तलावात असलेल्या मगरी आणि अन्य प्राण्यांमुळे असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही फवारणी बंद करण्यास सांगितले असून त्यामुळे या प्राण्यांच्या आरोग्यावर काही दुष्परिणाम होऊ शकतो का याचा अभ्यास केला जाणार आहे, असेही मंडळाने नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here