X: @maharashtracity

मुंबई: पार्ले महोत्सवामध्ये क्रिडा स्पर्धांमध्ये जशी चुरस दिसून येत आहे, तशीच गायनाच्या स्पर्धांनीही रसिकांनी मने जिंकली. यात विशेषतः वरिष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय ठरला. ६० वर्षांवरील गटात सुहास कुलकर्णी तर ७५ वर्षांवरील वयोगटात विश्वास डोंगरे, कांचन गुप्ते, जगदीश मुदलीयार, अरुण मानसाबदार यांनी बाजी मारत रसिकांवर आपल्या गायनाची भुरळ पाडली. लहानांपासून ते  वरिष्ठ नागरिकांपर्यंत मिळणारा प्रतिसाद, त्यांचा सहभाग भरघोस असून त्यांना पार्ले महोत्सवाचे मिळालेले व्यासपीठ हे अत्यंत समाधानाची बाब आहे. महोत्सवात सर्व वयोगटांचा सहभाग त्यामुळे अधोरेखित होत असून हा त्यांचाच महोत्सव असल्याचे महोत्सवाचे मुख्य आयोजक आमदार पराग अळवणी यांनी सांगितले.

विविध गटातील गायन स्पर्धेतील निकाल – 

पहिले तीन विजेते – वयोगट ५ ते १० वर्षे – मराठी गायन – तनिषा रेगे, योगिनी सामंत, अर्नेश खऱे. हिंदी गायन – योगिनी सामंत, अर्भी भालेराव, आरव संगोई. वयोगट ११ ते १६ वर्षे – मराठी गायन – हर्षवर्धन गोरे, अमृती धुमे, मधुरा माशनकर, हिंदी गायन – अमृता धुमे, हर्षवर्धन गोरे, मधुरा माशनकर. उत्तेजनार्थ – सृष्टी शर्मा आणि अथर्व जोशी

वयोगट १७ ते ३० वर्षे – मराठी गायन – गौरी मिश्रा, सायरी गद्रे, चिन्मय काळे, हिंदी गायन – गौरी मिश्रा, चिन्मय काळे, सायली गद्रे, 

वयोगट ३१ ते ४५ वर्षे – मराठी गायन – अजय दाते, विनायक कुलकर्णी, हिंदी गायन – अजय दाते, अद्वैत नेने, रिना बागवे, 

वयोगट ४६ ते ५९ वर्षे – मराठी गायन – नूतन बापट, दीपा शिरोडकर, मनिष शिरोडकर, हिंदी गायन – दीपा शिरोडकर, मनिष शिरोडकर, संदीप गोगटे, 

वयोगट ६० ते ७४ वर्षे – विजेते सुहास कुलकर्णी, 

वयोगट ७५ वर्षांवरील – मराठी गायन – विश्वास डोंगरे, कांचन गुप्ते, हिंदी गायन – जगदीश मुदलीयार, अरुण मानसाबदार. 

स्पर्धेचे परीक्षण अर्चना गोरे, अश्विनी शेंड्ये, प्राजक्ता रानडे, मंदार आपटे, ऋषिकेश कामेरकर यांनी केले.

दरम्यान, कराओके स्पर्धेलाही गायकांचा विशेष प्रतिसाद मिळाला. या स्पर्धा महिला आणि पुरुष गटात झाल्या. त्यातील विजेते असे – पुरुष गट – प्रथम – चिन्मय काळे, द्वितीय – आदित्य तांबुस्कर, तृतीय – सतीश धुरी, उत्तेजनार्थ – मनिष शिरोडकर, महिला गट – प्रथम – गौरी मिश्रा, द्वितीय – आस्था हळदणकर, तृतीय – सृष्टी शर्मा, उत्तेजनार्थ – विद्या आईल. दुहेरी गटातील विजेते – गौरी मिश्रा आणि अजय दाते, दिपा शिरोडकर आणि मनिष शिरोडकर. 

विशेष प्रोत्साहन पुरस्कार – धनुष यादव, गीता खानोलकर, कांचन गुप्ते, सर्वोत्कृष्ट सादरीकरण – सायली गद्रे. 

या स्पर्धेचे परीक्षण चिंतामणी सोहोनी, जयंत पिंगुळकर, मधुरा देशपांडे यांनी केले.

Also Read: महाडकरांना खड्डे मुक्त रस्त्यांची प्रतीक्षा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here