Twitter : @maharashtracity
मुंबई: राष्ट्रवादी कोंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या डाव्या डोळ्यातील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया मागच्या डिसेंबर महिन्यात करण्यात आली. आता उजव्या डोळयातील मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. मंगळवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार असल्याने तत्पूर्वीची विश्रांती घेण्याचा वैद्यकीय सल्ला त्यांना देण्यात आला आहे. शिवाय १८ जानेवारी पर्यंत सक्तीची विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे ते सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणार नाहीत. या दरम्यान, ते मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार करणार होते. मात्र, शरद पवार यांना शस्त्रक्रियेपूर्वीची विश्रांती सुचविल्याने ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.