Twitter: @maharashtracity

मुंबई: कोविड रुग्णांसह इनफ्ल्यूएंझाचे रुग्ण मुंबईत आढळून येत आहेत. गेल्या तीन महिन्याची आकडेवारी पाहिल्यास रुग्णसंख्येत चौपट वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात एच१एन१चे रुग्ण १८, फेब्रुवारीत ३९ तर मार्च महिन्यात ५५ आढळून आले. तीन महिन्यात एकूण ११२ रुग्ण आढळून आले. तर एच३एन२ चे जानेवारी महिन्यात १९, फेब्रुवारी महिन्यात ७ तर मार्च महिन्यात २१ असे एकूण २९ रुग्ण एच३एन२ विषाणूचे आहेत. यात मृत्यू झाला नसल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ए, डी, एफ साऊथ आणि जी साऊथ या वॉर्डात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे. कस्तुरबा रुग्णालय, केईएम रुग्णालयात यांच्या तपासण्या करण्यात येत आहेत. या दोन्ही रुग्णालयात दररोज २०० नमुने तपासण्याची क्षमता आहे. कस्तुरबा रुग्णलयात प्रामुख्याने आयसोलेशन बेडची सोय करण्यात आली असून पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये जसे सायन, केईम, नायर आणि कुपर रुग्णालयात देखील सुविधा आहे. तसेच १७ उपनगरीय रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी न जाता ताप सर्दी खोकला सारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरला भेटा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here