@maharashtracity

मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, चिकनगुनियाच्या रुग्णात तिपटीने वाढ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत गेल्या २१ दिवसात मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टो चिकनगुनिया या साथीच्या आजारांचे (epidemic) रुग्ण तिप्पटीने वाढले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department) केले आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहिती नुसार १ ते २१ नोव्हेंबर दरम्यान मलेरियाचे (Malaria) २३४ रुग्ण, डेंग्यू (Dengue) ९१, गॅस्ट्रो २००, कावीळ २४, चिकनगुनीया १२ (Chikungunya), लेप्टो ६ (Leptospirosis), तर स्वाईन फ्ल्यूच्या (Swine Flu) एका रुग्णाची नोंद झाली आहे.

गेल्या वर्षभरापासून मुंबई कोरोना (corona) विरोधात लढा देत आहे. मात्र पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचे संकट आजही कायम असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी ज्या पद्धतीने खबरदारी घेतली त्याचप्रमाणे साथीच्या आजार रोखण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here