@maharashtracity
नऊ पैकी सहा प्रभागात शिवसेेनेचे वर्चस्व
१४ जानेवारीपर्यंत हरकती, सूचनांसाठी मुदत
प्रभाग रचना भाजपसाठी काहीशी मारक तर शिवसेनेसाठी तारक
(३) प्रभागांची संख्या :- पश्चिम उपनगरे – १०५ , पूर्व उपनगरे -७२, शहर -५९ जागा आहेत.
मुंबई: मुंबई महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक तोंडावर अली आहे. ओबीसी आरक्षणाच्या तिढयामुळे अद्याप तारीख जाहीर झालेली नाही. मात्र पालिकेने मुंबईतील प्रभागांची संख्या २२७ वरून वाढवून २३६ केली असून सीमांकन जाहिर केले आहे. त्यामुळे आता त्यावर हरकती व सूचना पाठविण्यासाठी १४ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रभाग रचनेचा , सीमांकनाचा काही ठिकाणी सत्ताधारी शिवसेनेला लाभ होण्याचा व भाजपला काही ठिकाणी मारक ठरणार असल्याची चर्चा आहे.
२०१७ च्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेकडून सत्ता हातातून जाता जाता वाचली. शिवसेना व भाजप यांच्यात फक्त २ जागांचे अंतर होते. मात्र सत्तेसाठी शिवसेनेने सर्व शक्ती पणाला लावून व अपक्षांना सोबत घेऊन कशीबशी सत्ता राखली.
भाजपकडून पालिका सभा, स्थायी समिती बैठकीत शिवसेनेला वारंवार घेरण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे शिवसेना व काँग्रेस यांच्यातील वाद निवडणुकीत चांगलाच गाजणार असल्याचे समजते.
मुंबई महापालिका प्रशासनाने प्रभाग रचना जाहीर केली आहे. प्रभाग रचनेवर हरकती सूचना मागवण्यात आल्या आहेत. यंदा मुंबईत लोकसंख्या ९ ने वाढली आहे. त्यापैकी ६ विभागात शिवसेनेला लाभ तर ३ प्रभागात भाजपचे वर्चस्व वाढणार आहे.
हरकती, सुचना मागविणार
नागरिकांनी १४ फेब्रुवारी रोजी प्रभाग सुचना व हकरती पाठवणे पालिकेला अपेक्षित आहे. या हरकती व सुचना मस्जिद बंदर येथील निवडणुक मुख्य कार्यालय,जे.वी.शाह मंडई, मजला,युसूफ मेहरअली मार्ग,मशिद बंदर,मुंबई -४०००९ येथे संपर्क करणे अपेक्षित आहे.
प्रत्येक प्रभागांच्या करनिर्धारण संकलन विभागातही हकरती व सूचना देता येणार आहेत.
या मसुद्या नुसार, दहिसर-मागाठाणे (आर उत्तर), कांदिवली (आर दक्षिण), जोगेश्वरी अंधेरी पुर्व (के पुर्व), कुर्ला (एल), घाटकोपर (एन), चेंबूर (एम पश्चिम), लालबाग परळ (एफ दक्षिण), वरळी प्रभादेवी (जी दक्षिण),भायखळा (ई) या ठिकाणी प्रत्येक एक प्रभाग वाढला आहे.
आर उत्तर, के पुर्व, एल, एन, एफ दक्षिण, जी दक्षिण या सहा प्रभागांमध्ये शिवसेनेची नगरसेवक संख्या जास्त आहे.
आर दक्षिण, एम पश्चिम या दोन प्रभागात भाजपचे वर्चस्व आहे.
ई प्रभागात समिश्र परिस्थिती