@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेचे विविध बँकांत मुदत ठेवींच्या स्वरूपात तब्बल ८७ हजार १३१ कोटी ५७ लाख रुपये राखीव निधी स्वरूपात आहेत. त्यापैकी ५५ हजार ८०७ कोटी ६८ लाख रुपये हा निधी पायाभूत सुविधांसाठी वापरण्यात येणार आहे.

३१ हजार ३२३ कोटी ८९ लाख रुपये एवढा निधीं हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन, उपदान निधी, कंत्राटदार व इतर पक्षकार यांची अनामत ठेव रक्कम स्वरूपात आहे.

त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांच्या व कंत्राटदाराच्या निधीला हात लावू शकत नाही. मात्र बाकी ५५ हजार ८०७ कोटी ६८ लाख रुपये हा निधी पायाभूत सुविधांसाठी वापर केला जाऊ शकतो. भाजपने या राखीव निधी आणि अंतर्गत निधीचा वापर करण्यावर आक्षेप घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here