आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सुचना

@maharashtracity

प्रतिनिधी

मुंबई

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर छत्रपती संभाजी राजे भोसले मुंबईतील आझाद मैदनात उपोषणाला बसले आहेत. रविवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता. मात्र, या दरम्यान महाराजांच्या तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय पथक आले नसल्याचा आरोप करत मैदानात गोंधळ निर्माण झाला होता. यावर महाराजांची दर सहा तासाला प्रकृती तपासली जात असल्याचे सांगत तशी सुचना केल्याची राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले.

दरम्यान, छत्रपती संभाजी राजे भोसले उपोषणला बसले असताना तीन दिवस उलटूनही त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी सरकारी वैद्यकीय तपासणी पथक आले नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. तसेच राजेश टोपे हाय हाय… च्या घोषणा देण्यात आल्या. राज्याचे आरोग्यमंत्री तसेच मुख्यमंत्री कोणी असले तरी उपोषणाला बसलेल्याची प्रकृती दर दोन तासांनी तपासण्यास सरकारी वैद्यकीय पथक येते. मात्र इकडे कोणीच फिरकले नसल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला.

शिवाय आम्ही खासगी डॉक्टर आणून प्रकृती तपासली जात असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. राजे तीन दिवसांपासून उपाशी आहेत.  १०८ रुग्णवाहिकेतून आलेले डॉक्टर सरकारचे नाही. सरकारला माज आला आहे. त्याची किंमत या सरकारला मोजावी लागेल, अशी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांचा संपूर्ण रोष सरकार आणि आरोग्य मंत्र्यांवर होता. दरम्यान यावर राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराजांची दर सहा तासाला तपासणी होत असल्याचे स्पष्ट केले. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या उपोषणबाबत त्यांची तपासणी करण्यासाठी आझाद मैदानात डॉक्टर पाठविण्यात आले आहेत.

रविवारी सकाळी दहा वाजता सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने डॉक्टर गेले. राज्य सरकारच्या जीटी रुग्णालयाचे फॉरेन्सिक विभागप्रमुख डॉ. चिखलीकर आणि टीम त्या ठिकाणी गेली. संपूर्ण तपासणी करण्यात आली. महाराजांना कमजोरी आली आहे. मात्र, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांच्या टीमने सांगितले. दर सहा तासांनी महाराजांना तपासावे, अशी सूचना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. या सूचना पाळल्या जात आहेत. काळजी करण्याची गरज नाही. महाराजांच्या  प्रकृतीची काळजी घेत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here