@maharashtracity
आगामी २८ दिवस मुंबईकरांना परीक्षेचा
मुंबई: विषाणूतील आर फॅक्टर हा हजार पटीने संसर्ग पसरवणारा घटक असून या सोबत डेल्टा व्हेरियंट (Delta Variant) तिसऱ्या लाटेला प्रमुख कारणीभूत असल्याचे जागतिक पातळीवर दिसून येत आहे. त्यामुळे सध्या मिळत असलेल्या ताळेबंदीतील शिथिलतेत कोविड प्रतिबंधात्मक वर्तणुकीवर सर्वांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. अन्यथा संभाव्य तिसऱ्या लाटेचा परिणाम प्रभावी असू शकतो, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
दरम्यान, १ ऑगस्टपासून शिथिलता वाढविण्यात आल्याने त्या दिवसापासून आगामी २८ दिवस मुंबईकरांना परीक्षेचे ठरणार आहेत. कोणत्याही विषाणूच्या संसर्गाचा कालावधी हा २८ दिवसांचा असतो. शिथिलता दिल्यापासून २८ दिवसांच्या कालावधीनंतर रूग्ण संख्या वाढू लागल्यास प्रतिबंधात्मक नियम पाळले गेले नसल्याचेच स्पष्ट होते.
यावर बोलताना केईएम रुग्णालयाचे (KEM Hospital) अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख यांनी सांगितले की, टाळेबंदीनंतर (Lockdown) २८ दिवसांचा कालावधी परीक्षेचा असतो. या कालावधीत अत्यवस्थेत असलेल्या रुग्णांचे मृत्यू झाल्यास किंवा अत्यवस्थेत रूग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढले तर लाटेची लक्षण मानली जातात. मात्र, पालिका सज्ज असल्याचे ही डॉ. देशमुख म्हणाले.
त्यासाठी तीन जम्बो कोविड केंद्र तयार करण्यात आली आहेत. सायन, कांजूर आणि दहिसर या ठिकाणी ६ हजार बेड सहित सज्ज आहेत. मात्र हे लोकांच्या कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर वर अवलंबून असणार, असे ते म्हणाले.
आर फॅक्टर हा विषाणूतील रिप्रॉडक्टिव्ह फॅक्टर म्हणून ओळखला जातो. हा एका हून अधिक असल्यास संसर्ग द्विगुणित करू शकतो. आर फॅक्टर संसर्गित व्यक्तीला आयसोलेट केल्यास आर फॅक्टर एका हून कमी होण्याची शक्यता असते. यातील प्रामुख्याने लक्षण म्हणजे चव वास जाणे हे आहे.