राज्यात ४६७ नवीन कोरोना रुग्ण

@maharashtracity

मुंबई: राज्यात गुरुवारी ४६७ नवीन कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,६७,३९१ झाली आहे. आज ११४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,१४,७१९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) ९८.०६ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ४,९५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान राज्यातील ओमिक्रॉन रूग्ण (omicron patients) फक्त मुंबईतच नोंद झाली.

दरम्यान, राज्यात गुरुवारी १२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,८०,६५,९६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६७,३९१ (१०.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ४२,११८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६०२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत ८० बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ८० एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०,५५,८११ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६,६९१ एवढी झाली आहे.

राज्यात २३४ ओमायक्रॉन

राज्यात गुरुवारी २३४ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण कस्तुरबा हॉस्पिटल प्रयोगशाळा यांनी रिपोर्ट केले असून सर्व मुंबईतीलच आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ५००५ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ४६२९ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी (RTPCR test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ९३८२ नमुने जनुकीय तपासणीसाठी (genome sequencing) पाठवण्यात आले असून त्यांपैकी ८७१४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ६६८ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here