अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांची माहिती

@maharashtracity

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामांना १ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. पावसाळयापूर्वीच नालेसफाईची कामे पूर्ण करण्यात येतील, असा दावा पालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू (IAS P Velrasu) यांनी केला आहे.

भाजपचे नेते आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar), पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी, नालेसफाई कामाचे प्रस्ताव रखडल्याने नालेसफाई (nullah cleaning) वेळेत न झाल्यास पावसाळ्यात मुंबईची तुंबई होण्याची शक्यता व्यक्त करीत पालिका प्रशासन व सत्ताधारी शिवसेनेला (Shiv Sena) टार्गेट केले. त्या अनुषंगाने पालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली आहे.

वास्तविक, पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी पालिका आयुक्त व प्रशासकीय अधिकारी इकबाल चहल (BMC Commissioner IS Chahal) यांनी नालेसफाईच्या प्रस्तावांना स्वतःच्या अधिकारात मंजुरी दिली. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम होणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी १ एप्रिलपासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. शहर व उपनगरातील नालेसफाईसाठीचे प्रस्ताव गुरुवारी प्रशासकीय अधिकारात मंजूर करण्यात आले आहेत.

तसेच, नालेसफाईची कामे तीन टप्प्यात केली जातील. पावसाळ्यापूर्वी ८० टक्के, पावसाळ्यादरम्यान १० टक्के व पावसानंतर १० टक्के अशी १०० टक्के नालेसफाईची कामे करण्यात येणार असल्याचे पी. वेलरासू यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here