@maharashtracity
मुंबई: मुंबई महापालिकेतर्फे बोरिवली (Borivli) येथील १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (वल्लभ नगर आउटलेट) वळवण्याचे काम ५ मे रोजी रात्री ११.५५ वाजेपासून ६ मे रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या २४ तासांच्या कालावधीत बोरिवली व दहिसर (Dahisar) येथील पाणीपुरवठा बंद (no water supply) ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी अगोदरच आवश्यक पाण्याचा साठा करून त्यांचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
महापालिकेतर्फे (BMC) बोरिवली (पश्चिम) परिसरातील ‘आर/मध्य’ विभाग परिसरातील ऑरा हॉटेल समोरील लिंक रोडच्या पूर्वेकडील बाजूस १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (वल्लभ नगर आउटलेट) वळवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत ‘आर/ मध्य’ बोरिवली व ‘आर /उत्तर’ दहिसर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
या विभागात पाणीपुरवठा बंद राहील
‘आर/मध्य’ बोरिवली विभाग -:
चारकोप, गोराई, एक्सर, शिंपोली, वझिरा व संपूर्ण बोरिवली (पश्चिम) विभाग – (सायंकाळी ७.१० ते रात्रौ ९.४० आणि सकाळी ११.५० ते दुपारी १.५० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, ६ मे २०२२ रोजी कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहील).
‘आर/उत्तर’ दहिसर विभाग -:
एलआयसी वसाहत, एक्सर गाव, दहिसर गांव, कांदरपाडा, लिंक रोड व संपूर्ण दहिसर (पश्चिम) विभाग (रात्री ९.४० ते रात्री ११.५५ ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र,६ मे रोजी कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहील).