@maharashtracity

राज्यात २,७४८ नवीन कोरोना रुग्ण

मुंबई: राज्यात बुधवारी २,७४८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यात कोरोना संसर्गाला घसरण लागली असताना मुंबईत दुसऱ्यांदा कोविड मृत्यू शून्य नोंदविण्यात आला. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,५०,४९४ झाली आहे. आज ५,८०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण ७६,७५,५७८ कोरोनाबाधित (corona patients) रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७७ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २७,४४५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात बुधवारी ४१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६७,५७,२३८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,५०,४९४ (१०.२३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,७९,७४३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर ११६९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत २५५ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात आज दुसऱ्यांदा ० मृत्यू नोंदविण्यात आला. त्यामुळे मुंबईतील एकुण मृत्यूची संख्या १६,६८५ एवढीच राहिली आहे. तर दिवसभरात २५५ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०,५३,८१४ रुग्ण झाले आहेत.

राज्यात १११ ओमीक्रॉन रूग्ण

राज्यात बुधवारी १११ ओमीक्रॉन संसर्ग (Omicron patients) असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (NIV) रिपोर्ट केले आहेत. या १११ रुग्णांत अहमदनगर – २१, नवी मुंबई – १९, जालना आणि यवतमाळ प्रत्येकी १५, औरंगाबाद – १०, नागपूर आणि मुंबई प्रत्येकी ९, ठाणे मनपा- ६, मीरा भाईंदर मनपा आणि सातारा प्रत्येकी ३ तर लातूर -१ असे असल्याचे सांगण्यात आले.

आजपर्यंत राज्यात एकूण ४४५६ ओमीक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ३३३४ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी (RTPCR test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ८९०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी (genome sequencing) पाठवण्यात आले असून त्यापैकी ७९९१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ९१३ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here