Twitter : @maharashtracity
मुंबई
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाळी आजारांच्या अहवालानुसार गत वर्ष आणि महिनाच्या तुलनेत रुग्णसंख्या दिसून येत आहे. १ ते ८ जुलै या साप्ताहिक अहवालातून आजाराची नोंद वाढल्याचे दिसून येत आहे. यात सर्वाधिक गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले आहेत. इतरही आजारांचे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहेत.
दरम्यान, १ ते ८ जुलै या साप्ताहिक अहवालात हिवताप १५६, लेप्टो २९, डेंग्यू ९१, गॅस्ट्रो ४७४, हेपीटिसिस ३४, चिकनगुनिया ५ तर एच१एन१ ३४ अशी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ही आठवडाभरातील नोंद असून पावसाळी आजाराचे रुग्ण वाढल्याचेच समोर येत आहे. यावर मुंबई महानगरपालिकेने पावसाळाजन्य आजारांशी संबंधित आढळून येणारी सर्व रुग्णसंख्या नोंदवण्यासाठी पुढाकार घेतला असून २०२३ मध्ये नोंदवलेली रुग्णसंख्या अधिक असल्याचे कारण म्हणजे आरोग्य यंत्रणेतील नोंदणी केंद्रांची संख्या २२ वरून ८८० इतकी झाली असल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले. तसेच या केंद्रांमध्ये महानगरपालिकेचे दवाखाने, महानगरपालिकेची रूग्णालये, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, अतिरिक्त खासगी प्रयोगशाळा आणि खासगी रुग्णालये यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले.
या कालावधीत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन तापाचे सर्वेक्षण केले. तसेच अधिक धोका असणाऱ्या परिसरांची शोधमोहीम व नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवली. तापाच्या सर्वेक्षणाच्या मोहीमेत गृहभेटीतून ४ लाख ९८ हजार ७५० घरांचे सर्वेक्षण केले. यात २४ लाख ९३ हजार ७५० लोकसंख्येचे सर्वेक्षण केले. ताप असल्याने २ हजार २९४ रुग्णांना उपचारासाठी संदर्भित केले. तर ३१ हजार ९९४ जणांचे हिवताप रक्त तपासणीसाठी रक्त नमुने संकलन करण्यात आले.
जुलै २०२२ जून २०२३ जुलै २०२३
(१ जुलै ते ८ जुलै)
आजार रुग्ण संख्या रुग्ण संख्या रुग्ण संख्या
मलेरिया ५६३ ६७६ १५६
लेप्टो ६५ ९७ २९
डेंगी ६१ ३५३ ९१
गॅस्ट्रो ६७९ १,७४४ ४७४
हेपीटिसिस ६५ १४१ ३४
चिकनगुनिया २ ८ ५
एच१ एन१ १०५ ९० ३४