@maharashtracity

केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. जितेंद्र सिंग व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: वेधशाळेच्या स्थापना दिनी म्हणजेच १४ जानेवारीपासून मुंबईत दुसरे रडार (Radar) सुरु होत आहे. मेक इन इंडिया (Make In India) उपक्रमातील संपूर्णतः भारतीय बनावटीचे (indigenous) हे पहिले रडार असल्याचे सांगण्यात आले.

गोरेगाव येथील वेरावली येथे सी बॅण्डच्या रडारचे (C band radar) शुक्रवारी १४ जानेवारी रोजी पृथ्वी व विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. जितेंद्र सिंग (Union MoS Dr Jitendra Singh) तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

या रडारमुळे मुंबईच्या ४५० किलोमीटर परिघातील वातावरण बदल (climate change) तसेच प्रत्येक तीन तासांमधील मुसळधार पाऊस (heavy rain), मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटाबाबत (lightning) या रडारच्या उपयोगातून माहिती मिळणार आहे.

भारतात मुंबईसह (Mumbai) दिल्ली (Delhi), लेह (Leh) आणि चेन्नईत (Chennai) अशा चार ठिकाणी एकाच दिवशी चार रडार कार्यान्वित होणार आहे. यापूर्वी मुंबईत कुलाबा वेधशाळेनजीक (Colaba observatory) एस बॅण्डचे रडार कार्यान्वित असून यावरून वादळ तसेच पावसाच्या अंदाज वर्तवला जातो.

मुंबईतील २६ जुलैच्या जलप्रलयानंतर मुंबईतील हवामानाच्या अंदाजासासाठी अजून एका रडाराची गरज भासू लागली होती. त्याप्रमाणे केंद्राने आणि राज्याने प्रयत्न सुरू ठेवले. रडारसाठी जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरु केले.

या रडारबाबत सांगताना रडारची निर्मिती इस्त्रेक आणि इस्रोमधील (ISRO) रडार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली झाली असून याचा वापर पावसाच्या अचूक अंदाजासाठी करण्यात येईल. या रडारमुळे मुंबईच्या ४५० किलोमीटर भागांतील वातावरणातील बदल वेधशाळेला पाहता येणार आहे. तसेच प्रत्येक तीन तासांमधील मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटाबाबत या रडारच्या उपयोगातून माहिती मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here