Twitter: @maharashtracity
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या (BMC health department) गोवर मृत्यू तपासणीच्या शुक्रवारच्या अहवालानुसार ८ नवे गोवर निश्चित रुग्णांची नोंद करण्यात आली. यात जी दक्षिण वॉर्ड १, पश्चिम उपनगरातील पी उत्तर ३, आर दक्षिण २, पूर्व उपनगरातील एल १, एन १, अशा ८ रुग्णांची नोंद करण्यात आली.
सध्या महापालिकेच्या रुग्णालयात एकूण ३१ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील तिघेजण व्हेंटीलेटरवर असल्याचे सांगण्यात आले. तर आतापर्यंत २८ जणांना घरी सोडण्यात आले. आज शुक्रवारी ८ गोवर रुग्णांची (measles patients) नोंद झाल्याने आजपर्यंत २६० निश्चित गोवर रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, आतापर्यंत २६ लाख ८२ हजार २१० घरांची तपासणी करण्यात आली असून यातून १३६ ताप आणि पुरळ असलेले रुग्ण आढळून आले. तर ९४ नियमित लसीकरण (vaccination) सत्रातून २२८ जणांना एमआर१ तसेच २२९ जणांना एमएमआर लस देण्यात आली. शिवाय १४५ अतिरिक्त सत्रातून ३५१ जणांना एमआर१ तर ४१३ जणांना एमएमआर लस देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.