@maharashtracity

मुंबई: कोविडचा बुस्टर डोस (booster dose) मोफत देण्याचा म्हणजेच बुस्टर डोस अमृत महोत्सव शुक्रवारपासून सुरु झाला. अमृत महोत्सवाच्या पहिल्या दिवसात मुंबईत एकूण १४ हजार १९५ लाभार्थ्यांनी बुस्टर डोस घेतला असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, शुक्रवारी ३९४ सत्रात हे लसीकरण (vaccination) घेण्यात आले असून पालिका रुग्णालये, लसीकरण केंद्र तसेच राज्य सरकारी रुग्णालये आणि खासगी लसीकरण केंद्रांवर बुस्टर डोस देण्यात आला. या सर्व लसीकरण केंद्रांत आरोग्य कर्मचारी फ्रंट लाईन वर्कर असे मिळून ३७८ जणांना बुस्टर डोस देण्यात आला. तर १४४७ लाभार्थी हे ६० वर्षा वरील ज्येष्ठ नागरिक होते.

तसेच ४५ ते ५९ वर्षावरील नागरिक, यात ओळखपत्र नसलेले, तसेच दिव्यांग आणि इतर अशा ४७६६ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. तर १८ ते ४४ वर्षावरील गटात विद्यार्थी तसेच स्तनपान करणाऱ्या माता अशा ७६०४ जणांना बुस्टर डोस देण्यात आला. हे सर्व मिळून एकूण १४ हजार १९५ लाभार्थ्यांनी बुस्टर डोस घेतला असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here