@maharashtracity
मुंबई: देशातून मोसमी मान्सूनने मंगळवारपासून काढता पाय घेतला असला तरी मुंबईत मात्र ५ ते १० ऑक्टोबरपर्यंत पावसाच्या सरी अनुभवयास येणार असल्याचे मुंबई वेध शाळेकडून सांगण्यात आले. मुंबईत मान्सून माघारीची प्रक्रिया ऑक्टोबरपासून सुरु होणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबईतील अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी शहरात १ तर ४ मिमी एवढी नोंद करण्यात आली.
मान्सून माघारीची प्रक्रिया सुरु झाल्यावर राजस्थान, त्यानंतर गुजरात (Gujarat), महाराष्ट्र (Maharashtra) आणि भारताच्या इतर भागात आगमन झाले असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने घोषित केले. भारतासाठी, मान्सूनची सुरुवात केरळमध्ये मान्सूनच्या सुरूवातीस झालेल्या पावसाच्या क्रियाकलापांवरून निर्धारित केली जाते आणि मान्सूनच्या शेवटी राजस्थानमधील हवामान परिस्थितीनुसार मान्सूनची माघार निश्चित केली जाते. या वर्षासाठी, राजस्थानमधून (Rajasthan) माघार घेण्यास मंगळवारी सुरुवात झाली. मुंबई शहर आणि जवळपासच्या प्रदेशात ५ ते १० ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघार असल्याचे अधिकारी सुषमा नायर म्हणाल्या.