बोरीवली येथे घडला अभूतपूर्व सोहळा
By Yogesh Trivedi
Twitter : @maharashtracity
मुंबई: श्री सद्गुरु दादाजी भक्त परिवाराकडून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली येथे एक श्रद्धेय सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यामध्ये पुरातन व ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा जतन करणाऱ्या पुणे येथील राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. या संग्रहालयामध्ये सुमारे २५ हजार पेक्षा जास्त पुरातन व ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह जतन केला आहे.
मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांच्या वाड्यातील कलात्मक झुंबरे व इतर वस्तू संग्रहालयात आहेत. आपला राष्ट्रीय ठेवा जतन करणे हे केवळ शासन अथवा राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी नाही, तर या व्रताला आपलाही हातभार लागला पाहिजे या भावनेने, गुरुपौर्णिमेचा प्रसाद म्हणून राजा दिनकर केळकर संग्रहालयाला द्रव्यार्पण करण्याचा एक पायंडा या भक्तपरिवाराने पाडला आहे.