@maharashtracity

मुंबई: चेंबूर (Chembur) येथे रविवारी घरांवर भिंत कोसळून १९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले. विक्रोळी (Vikhroli) येथेही दरड कोसळून १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर १ जण जखमी झाला.

भांडुप (Bhandup) येथे घराच्या पडझडीत एकजण मृत पावले. तसेच, चांदीवली येथे दरड कोसळून २ जण जखमी झाले. तर इलेक्ट्रिक शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला. विविध दुर्घटनांत ३२ जणांचा मृत्यू झाला.

या ठिकाणी पुन्हा काही दुर्घटना घडू नये व त्यामध्ये जीवित, वित्तीय हानी होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने चेंबूर येथील न्यू भारत नगर परिसरातील ३८ घरांत राहणाऱ्या १४५ नागरिकांचे आणि विक्रोळी सूर्यनगर परिसरातील ३० नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करण्यात आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी, रविवारी तीन ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनांची गंभीर दखल घेऊन सरकारी व पालिका यंत्रणेला यापुढे अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, मुंबई महापालिका (BMC), जिल्हाधिकारी यंत्रणा आदी अलर्ट झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here