@maharashtracity

मुंबई: मुंबईची आधुनिक जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो – ३ प्रकल्पाची कारशेड आरे कॉलनीतच उभारली जाईल यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सह्याद्री अतिगृहात गणेश मंडळ आणि उत्सवबाबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे (CM Eknath Shinde) अणि फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मेट्रो कारशेडबाबत (metro carshed) असलेल्या सर्व शंकांना पूर्णविराम दिला.

सन २०१४ ते २०१९ या कालावधीत फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष – शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना कुलाबा – Seepz या मेट्रो – ३ प्रकल्पाची कारशेड आरे कॉलनीत (Aarey colony) उभारण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ३० हेक्टर जागा संपादित करण्यात आली होती तर २१४१ झाडे तोडण्यात आली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, त्यांच्या सरकारच्या काळात आरे मेट्रो कारशेड प्रकल्पावर १०० कोटी रुपये खर्च झाला होता. या कराशेडचे २५ टक्के काम झाले होते. मात्र, उध्दव ठाकरे सरकारने (Uddhav Thackeray government) ही कारशेड कांजूरमार्ग (Kanjur Marg) येथे हलविण्याचा निर्णय घेतला आणि प्रकल्प रखडला.

फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या अडीच वर्षात आरे की कांजूरमार्ग या वादात मेट्रो -३ प्रकल्पाचा खर्च १० हजार कोटी रुपयांनी वाढला. अजूनही कांजूरच्या जागेचा आग्रह सोडला नाही तर पुढील पाच वर्षे कुलाबा – Seepz मेट्रो प्रकल्प होणार नाही आणि खर्चही वाढेल.

मूळ १२ हजार कोटी रुपयांचा असलेला मेट्रो-३ प्रकल्प खर्च २२ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे (cost escalation). हा खर्च कमी कसा करता येईल यावर विचार सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here