राज्यात ७४५ गोवर रुग्णांची नोंद

Twitter: @maharashtracity

मुंबई: गोवरचा भिवंडी तसेच ठाण्यात मृत्यू नोंदविण्यात आले. यात अनुक्रमे एक आणि दोन असे मृत्यू असून यामुळे भिवंडीतील आजपर्यंतची एकूण मृत्यू संख्या तीन झाली आहे. तर राज्यात १८ गोवर मृत्यू (death by measles) झाले आहेत. तसेच गुरुवारच्या नोंदीत राज्यात ७४५ गोवरचे रुग्ण नोंदविण्यात आले. तर १२ हजार २४१ संशयित रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील गोवर उद्रेकात (measles outbreak) मुंबईत ३७, मालेगाव १२, भिवंडी १०, ठाणे मनपा क्षेत्रात ८, ठाणे ग्रामीण २, वसई – विरार ८, पनवेल १, नवी मुंबई ४, औरंगाबाद ३, पिंपरी – चिंचवड, बुलढाणा, मीरा – भाईंदर आणि रायगड प्रत्येकी एक असे असल्याचे सांगण्यात आले. तर राज्यातील १८ मृत्यूमध्ये शून्य ते एक महिन्यातील ५ मुलांची नोंद आहे. तर १२ महिने ते २४ महिने कालावधीत १०, २५ महिने ते ६० महिने २, तर ६१ महिन्यापेक्षा अधिक कालावधीतील एक जण असल्याचे सांगण्यात आले. यापैकी एका मुलाने गोवर डोस घेतला होता. तर इतरांनी डोस घेतले नसल्याचे सांगण्यात आले. 

तसेच राज्यात गोवर प्रभावित भागात एकूण १,१२१ सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. तर ११,१९,९७५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. २६ हजार ४७७ बालकांना व्हिटॅमिन ए ची मात्रा देण्यात आली. तसेच ९ हजार ७४२ बालकांना पहिला डोस देण्यात आला. तर ७ हजार ६४४ जणांना गोवरचा दुसरा डोस देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here