@maharashtracity
अवयवदात्या कुटुंबियांचा करणार सन्मान
मुंबई: बारावा राष्ट्रीय अवयवदान दिन २७ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार असून या दिवशी केईएम रोटो आणि सोटो (The Regional Cum State Organ and Tissue Transplant Organisation – ROTTO – SOTTO)
विभागाचा सत्कार करण्यात येणार आहे. केईएम रोटा आणि सोटो या दोन्ही विभागाला उत्कृष्ट कामगिरीचे पुरस्कार केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते देवून गौरविण्यात येणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी केईएम रुग्णालयात (KEM Hospital) अवयवदात्या (organ donar) कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार असून अवयवदानाची चळवळ पुढे नेण्यासाठी जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे.
देशातील प्रादेशिक आणि राज्य असे दोन्ही रोटो-सोटो विभाग केईएम रुग्णालयात असून महाराष्ट्र (Maharashtra), गोवा (Goa), दमण आणि दिव, गुजरात (Gujarat) आणि मध्यप्रदेश (Madhya Pradesh) या राज्यात झालेल्या अवयवदानाच्या घटनांची नोंद या ठिकाणी ठेवली जाते.
दरम्यान याच केईएम रोटो सोटो विभागाने पश्चिम विभागात अवयवदान संबंधित जनजागरुकता उत्तमरित्या केली असून देशातील पश्चिम विभागातील अवयवदानाचे कार्यही उत्कृष्टरित्या सांभाळले आहे. यामुळेच देशातील उत्कृष्ट अवयवदान कामगिरीच्या पुरस्काराने केईएम रोटो-सोटो विभागाला सन्मानित करण्यात येणार आहे.
केईएम रुग्णालयात राज्य आणि प्रादेशिक असे दोन्ही पातळीवर अवयवदानाचे काम पाहिले जाते. २०१७ या वर्षात रोटो-सोटो विभाग केईएम रुग्णालयात स्थापन करण्यात आला. यात पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गोवा, दमण आणि दिव, गुजरात मध्य प्रदेश ही राज्य येतात.
या रोटो विभागातून अवयवदान गरजूंना निकषानुसार अवयवदान केले जातात. गेल्या वर्षी केईएम रोटो-सोटो विभागाचा दुसरा क्रमांक आला होता. या वर्षी देखील या विभागाने उत्कृष्ट जागरुकता निर्माण केली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच केईएम रुग्णालयाचा स्थापना दिन देखील साजरा होणार आहे. केईएम रुग्णालयाची स्थापना १९२५ सालातील आहे. या निमित्त केईएम रुग्णालयात अवयवदानाबाबत जन जागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तर शुक्रवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी अवयवदान करणाऱ्या कुटुंबियांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती केईएम रुग्णालय अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.