X: @maharashtracity
मुंबई: जे. जे. स्कूल ऑफ आर्ट च्या अभिमत विद्यापीठाच्या कुलपती पदी डॉ. ए. पी. जामखेडकर यांची शासनाने नियुक्ती केली आहे. ते जे. जे. स्कूल ऑफ आर्ट च्या अभिमत विद्यापीठाचे पहिले कुलपती ठरले आहे.
येत्या काही दिवसांत कुलगुरु पदाची ही नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने येत्या शैक्षिणक वर्षापासून अभिमत विद्यापीठाच्या प्रथम वर्ष शैक्षिणक अभ्यासक्रम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मागील वर्षी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला. अभिमत विद्यापीठप्रमाणे अभ्यासक्रम सोबत कुलगुरु, कुलपती यांची नियुक्ती, आदी शैक्षणिक घडामोडी शासन स्तरावर सुरु झाल्या आहेत.
डॉ. ए. पी. जामखेडकर यांची शासनाने जे. जे. स्कूल ऑफ आर्ट च्या अभिमत विद्यापीठाच्या आर्किटेक्ट आणि डिझायनर कॉलेजच्या कुलपती पदी नियुक्ती केली आहे. याआधी डॉ. जामखेडकर हे शासनाच्या पुरातत्व विभागाचे प्रमुख होते.
‘माझी निवड शासनाने जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या अभिमत विद्यापीठाच्या कुलपती पदी केली आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट च्या कलाकारांनी देश विदेशात स्वतःचा ठसा उमटविला आहे. आता अभिमत विद्यापीठाच्या दर्जातून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणखी उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास सरकारला वाटत आहे. तशी वाटचाल ही शासन करत आहे’, अशी प्रतिक्रिया डॉ. जामखेडकर यांनी महाराष्ट्र सिटी शी बोलताना व्यक्त केली.