@maharashtracity

मुंबई: सध्या दहिहंडी उत्सवाच्या उत्साहाचा सूर टिपेला पोहचला आहे. कोरोनाची (corona) भिती देखील कमी झाल्याने तसेच निर्बंध नसल्याने यंदाचा दहिहंडीचा उत्सव (Dahi Handi festival) मोठ्या दणक्यात साजरा होणार असल्याचे स्पष्ट होते. मात्र दहिहंडी फोडताना एखादा गोविंदा (Govinda) जखमी झाल्यास त्यावर उपचार करण्यासाठी सार्वजनिक रुग्णालये देखील सज्ज झाली आहेत. यात राज्य सरकारच्या जे जे रुग्णालय (J J Hospital) समूहाकडून जखमी गोविंदावर उपचारासाठी टिम सज्ज झाली असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, जेजे रुग्णालयात तयार करण्यात आलेली ही आपत्कालीन उपचार टिम २४ तास सतर्क राहणार आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या जखमी गोविंदांवर याच टिमकडून उपचार केले जातील. यात प्राध्यापक, निवासी डॉक्टर्स, सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी डॉक्टर २४ तास शिफ्टनुसार ड्युटी करणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या टीममध्ये वेगवेगळ्या विभागातील समर्पित डॉक्टर्स असणार आहेत. त्यात ऑर्थोपेडीक, रेडीओलॉजिस्ट, दंत शल्यचिकित्सा आणि मेडिसीन सर्जन्स, वैद्यकीय अधिकारी तसेच इतर निवासी आणि वरीष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी असतील. त्यामुळे, एखादा गोविंदा जर आपातकालीन स्थितीत रुग्णालयात दाखल झाला तर त्याच्यावर तात्काळ उपचार केले जातील. जर जास्त रुग्ण आले तर तात्काळ उपचार केले जातील अशी माहिती सर जेजे समुह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here