@maharashtracity

मुंबई: खार (प.) येथील तळमजला अधिक सात मजली नॉथन व्हीला या इमारतीत चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे इमारतीच्या गच्चीवर अडकून पडलेल्या चार जणांची अग्निशमन दलाच्या (Fire brigade) पथकाने शर्थीचे प्रयत्न करून वाचविले. मात्र, त्यांना धुराची बाधा झाल्याने त्यांच्यावर नजीकच्या वांद्रे भाभा रुग्णालयात (Bhabha Hospital) उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, खार ( प.), गुरू गणेश्वर मार्ग येथे ‘नॉथन व्हीला’ या तळमजला अधिक सात मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये गुरुवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी, आगीपासून बचाव होण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेलेले चार जण तेथे अडकून पडले.

या आगीची व त्यामुळे इमारतीच्या गच्चीवरील भागात अडकून पडलेल्या चार जणांची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य व आग विझविण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू केले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी ८ फायर इंजिन व ४ जंबो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने भीषण आगीवर दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास नियंत्रण मिळवून आग पूर्णपणे विझविली. आगीमुळे इमारतीतील चौथ्या मजल्यावरील काही भागात वित्तीय हानी झाली.

दरम्यान, माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here