@maharashtracity

परदेशी प्रवाशांची तीन पातळ्यावर होतेय छाननी

मुंबई: ओमिक्रॉन (Omicron) प्रभाव असलेल्या देशांतून विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी होत आहे. मात्र, काही प्रवासी खोटी माहिती देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे परदेशी प्रवाशांच्या माहितीची विविध पातळ्यांवर कसून छाननी होत असल्याची माहिती मुंबई महानगर पालिका (BMC) अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) दिलेल्या माहितीनुसार परदेशातून आलेल्या ३१८ नागरिकांची माहिती त्यांना मिळाली. यापैकी ३०६ नागरिक आढळून आले. तर उर्वरित १२ नागरिकांपेकी काहींचे पत्ते अपूर्ण असल्याचे अथवा काही तरी माहिती अपूर्ण असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.

काहींचे घरे बंद आढळून आली किंवा काहींचे दूरध्वनी क्रमांक बंद स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. अपूर्ण पत्ते असल्याने नागरिकांची यादी सरकारला परत पाठवून पूर्ण पत्ते घेतले जाणार असल्याचे कडोंमपाकडून सांगण्यात आले. तर ज्यांची घरे बंद अवस्थेत होती अशा घरांना पुन्हा भेट दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

हा अनुभव कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान देखील आला होता. बऱ्याच प्रमाणात माहिती खोटी सांगितली जात होती. तर काहींच्या कोरोना टेस्ट (covid test) घेतल्यास त्यांचा संपर्क क्रमांक हा खोटा सांगितला जात होता. यावरुन मुंबई महानगरपालिकेने मात्र नवीन तंत्र हाताळले होते.

यावर बोलताना मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, आपण यासाठी तीन पातळ्यांवर छाननी (scrutiny on three levels) करत आहोत. पासपोर्टवरुन (passport) पत्ता घेतला जात आहे. विमानतळावर भरण्यात आलेल्या माहितीवरुन माहिती घेतली जात आहे. तसेच घोषणापत्रावरुन माहिती घेतली जात आहे.

त्यामुळे माहितीची छाननी बऱ्यापैकी होत आहे. शिवाय पासपोर्टवर कोणीही पत्ता अथवा संपर्क क्रमांकाची लपवाछपवी करु शकत नाही, असे काकाणी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here