@maharashtracity

मुंबई: मुंबईमधील कोरोनाची पहिली व दुसरी लाट विविध उपाययोजना करून यशस्वीपणे रोखणारे मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (BMC Commissioner IS Chahal) यांचा ‘स्पीक इंडिया’ या प्रथितयश संस्थेद्वारे ‘एक्सलन्स इन क्रायसिस मॅनेजमेंट’ या पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.    

मात्र यानिमित्ताने मनोगत व्यक्त करताना पालिका आयुक्त चहल यांनी, हा पुरस्कार आणि गौरव हा खऱ्या अर्थाने पालिकेच्या सर्व कामगार – कर्मचारी व अधिकाऱ्यांचा असल्याचे नमूद करत सदर पुरस्कार त्यांना व पालिकेच्या संघ भावनेला समर्पित केला.   

भारतातील प्रशासकीय सेवेत वर्षभरात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना ‘स्पीक इंडिया’ (Speak India) या संस्थेद्वारे दरवर्षी गौरविले जाते. यंदाच्या पुरस्कारांमध्ये विशेष व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेतील (Indian Administrative Service) १० अधिका-यांचा गौरव करण्यात आला आहे.    

याअंतर्गत ‘एक्सलन्स इन क्रायसिस मॅनेजमेंट’ (Excellence in Crisis Management) या पुरस्काराने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांचा गौरव करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here