@maharashtracity

डॉ.आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

सह्याद्री वहिनी व पालिकेच्या समाजमाध्यमांवरुन ६ डिसेंबर रोजी होणार चैत्यभूमीचे थेट प्रक्षेपण

मुंबई: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी अखिल मानवी उत्थानासाठी केलेले कार्य चिरंतन आणि वंदनीय आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दरवर्षी अनुयायांचा सागर उसळतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५ व्या महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर रोजी आहे.

त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या कार्याबाबत व महापरिनिर्वाणदिनासाठी महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या तयारी बाबतची माहिती देणारी पुस्तिका महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने संकलित केली आहे. या सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुंबईच्‍या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते चैत्यभूमी लगतच्या नियंत्रण कक्ष येथे रविवारी करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केले.

यावेळी, उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, उपायुक्त (परिमंडळ २) हर्षद काळे, ‘जी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह नागसेन कांबळे, रमेश जाधव, रवी गरुड, प्रतीक कांबळे यांच्यासह अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असणारे ‘चैत्यभूमी’ (Chaitya Bhoomi) हे प्रेरणादायी स्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण विश्वाला वंदनीय आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे (Constitution) या व्यासपीठावर आम्ही विराजमान आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग व संपूर्ण मानव समाजासाठी त्यांचे असलेले भरीव योगदान सदैव प्रेरणादायी असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.

पालिका जनसंपर्क विभागाचे कौतुक

महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने डॉ. बाबासाहेब यांच्या जीवन कार्यावर आधारित चांगली माहिती संकलित असलेली पुस्तिका केल्याबद्दल महापौरांनी जनसंपर्क विभागाचे कौतुक केले.

महापालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रकाशित माहिती पुस्तिकेची संगणकीय माहिती महापालिकेच्या portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपण

प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता देखील अनुयायांना ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी (Mahaparinirvan Din) अभिवादन करता यावे, यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण मुंबई महापालिकेच्या समाजमाध्यमवरून आणि दूरदर्शनच्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here