Twitter: @maharashtracity
मुंबई: महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाने राज्यातील राजकारण ढवळून निघाले असताना मुंबईतील डॉक्टरांनी या पासून स्वतःला दूर ठेवत माणुसकीचा धर्म पाळणे पसंत केले आहे. कर्नाटकातून उपचारासाठी मुंबईत आलेल्या बाळाचे प्राण वाचवण्यात एच एन रिलायन्स फाउंडेशनच्या (H N Reliance Foundation Hospital) डॉक्टरांना यश आले आहे
कर्नाटकातून (Karnataka) उपचारांसाठी मुंबईत आलेल्या बाळाच्या हृदयाच्या धमन्या आणि शिरा चुकीच्या पद्धतीने जोडलेल्या अवस्थेत होत्या. शिवाय, मर्यादित होत्या. त्यामुळे, हृदय ऑक्सिजनयुक्त किंवा ऑक्सिजनरहित होण्याचा धोका असतो. त्याचसोबत त्याच्या हृदयात एक मोठे छिद्र होते. एका वॉल्वला रक्तप्रवाह अधिक होता. बाळाचे अगदी छोट्या प्रक्रियेमध्ये शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. यावर मार्ग म्हणून सुरुवातीला एक शस्त्रक्रिया करण्यात आली आणि बाळ तीन वर्षांचे झाल्यावर त्याच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करुन त्याचे आयुर्मान वाढण्यास मदत झाली.
बालरोग हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पराग भलगट यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळावर दोन वेळा शस्त्रक्रिया केली गेली. बाळाची सुधारणा होणे गरजेचे होते. शस्त्रक्रियेदरम्यान हृदयाला जवळपास सहा ते सात बंद करून ठेवले होते. शस्त्रक्रियेचा कालावधी १६ तासांचा होता. त्यामुळे, बाळासाठी एवढा मोठा ताण सहन करणे ही खूप अवघड गोष्ट होती.
रेडिओलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, कार्डियाक सर्जन यांचा या शस्त्रक्रियेत सहभाग होता. यासाठी रुग्णालयाच्या डॉ. जेरिल कुरियन, डॉ. भरत दळवी यांनी महत्वाची भूमिका बजावली. बाळ आता सामान्य क्रिया अगदी व्यवस्थितरित्या करत असून त्याला नुकतेच त्याला घरी सोडण्यात आले असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
या बाळाला सीटीजी (Corrected transposition of great arteries) नावाचा एक जटिल हृदयविकार होता. ही अत्यंत दुर्मिळ स्थिती असून १०,००० पैकी एकाला होते किंवा किंवा त्याहूनही कमी प्रमाणात आढळून येत असल्याचे सांगण्यात आले.